रोहा । रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत भरधाव डंपरच्या धडकेत अष्टमी कोळीवाडा येथील राज गणेश पतंगे (वय 22) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना शनिवारी, 20 जून रोजी रात्री सुमारे सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.
राज केटीएम मोटारसायकलवरुन नागोठणेहून रोहाकडे येत असताना भिसे खिंडीतील वळणावर भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याचा आरोप असून, याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहा पा े लिसा ंकडू न चालकाविरोधात कारवाई सुरु आहे. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पायक पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे अष्टमी परिसरात शोककळा पसरली असून, भिसे खिंडीत वारंवार होणार्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर येथे अधिक कडक वाहतूक नियंत्रण तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे