मुंबई | कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने त्या बदल्यात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर दीड वर्षांनंतर रायगडकरांना मिळणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या दोघांनीही या पदावर दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला.
दोन्ही पक्षांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने त्या बदल्यात शिवसेनेकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राहणार आहे. त्यामुळेच मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार, हे निश्चित मानले जात आहे.