पोलादपूर येथे अपघात;माय-लेकीचा दुर्दैवी मृत्य

By Raigad Times    01-Jun-2026
Total Views |
POLADPUR N
 
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
 
डॉ.अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह हे अहमदनगर जिल्ह्यातील गावी सुट्टी घालवून दापोलीकडे परतत होते. पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजी परिसरात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली.
 
या अपघातात सुवर्णा मरकड आणि अनुक्षी अनिल मरकड यांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णा मरकड या दापोली येथील स्टेट बँकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. अनिल मरकड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर चिन्मय मरकड याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी महाड येथे दाखल करण्यात आले आहे.