काशीद येथे तरुणीचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

By Raigad Times    28-May-2026
Total Views |
 kashid
 
मुरुड | मुरुडमधील काशीद आदिवासीवाडी येथे १८ वर्षीय तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे ते २६ मे दरम्यान ही घटना घडली.
 
कौटुंबिक वादाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी यांच्या १८ वर्षीय मुलीला घराबाहेर असताना पकडले. तिच्या छातीत लाथा मारुन तसेच मानेवर व पाठीवर हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली.
 
यानंतर तिच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ११५(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.