पनवेल येथे दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

By Raigad Times    26-May-2026
Total Views |
 new panvel
 
नवीन पनवेल | भरधाव वेगाने मोटरसायकल चालवल्याने ती रस्त्याच्या खाली जाऊन आदळली आणि एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाणे २४ मे रोजी करण्यात आली. अक्षय किसन काटकर (रा. मुंब्रा देवी कॉलनी दिवापूर्व ठाणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
 
रविवारी, २४ मे रोजी साडेसातच्या सुमारास अक्षय किसन काटकर हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल एम एच ०४ एम आय ७५ ३२ ही घेऊन भरधाव वेगाने जात होता. यावेळी जुना मुंबई पुणे हायवे रोडवर भोकरपाडा गावाजवळ त्याची मोटरसायकल रस्त्याच्या खाली गेली आणि जोरात आदळली.
 
यावेळी त्याच्या पाठीमागे बसलेला सुशांत दौलत पवार (रा.मुंब्रा देवी कॉलनी) हा जखमी झाला तर अक्षय काटकर याला गंभीर दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.