तळा पाणीपुरवठा योजनेसाठी आणखी सहा कोटी देणार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By Raigad Times    21-Apr-2026
Total Views |
tala
 
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
 
बोरीचामाळ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (19 एप्रिल) संपन्न झाला. यावेळी पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, निसर्गरम्य परिसरातील सुमारे 300 वर्षे जुन्या मंदिराच्या लोकार्पणाचे भाग्य लाभणे ही देवाची कृपा आहे.
 
या मंदिराची व्यवस्था, पावित्र्य आणि निगा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळात 567 महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मंत्री भरत गोगावले, आ. तुकाराम काते, नगरसेविका समृद्धी काते, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर,लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, विपुल उभारे, सुवर्णा करंजे, रमेश मोरे आदी उपस्थित होते.