नवी मुंबई विमानतळ परिसरात तुफान हाणामारी , ओला-उबेर चालकांकडून खाजगी वाहनचालकाला बेदम मारहाण

By Raigad Times    20-Apr-2026
Total Views |
 new mum
 
नवी मुंबई । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात रविवारी दुपारी तुफान हाणामारीची घटना घडली असून, ओला-उबेर चालकांकडून, खाजगी चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
प्रवासी उचलण्याच्या कारणावरून ओला-उबेर चालक आणि खाजगी वाहनचालक यांच्यात वाद झाला. हा वाद क्षणातच उग्र रुप धारण करत मारहाणीत परिवर्तित झाला. संतप्त झालेल्या काही चालकांनी एकत्र येत संबंधित खाजगी वाहन चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
 
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिक आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.