भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे २२ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते बोलत होते. कोणत्याही माफियांना सोडू नका,तसेच अधिकार्यांचे किंवा कर्मचार्यांचे अवैध व्यवसायाशी संबंध आढळल्यास त्यांना केवळ निलंबित न करता थेट नोकरीतून बडतर्फ करण्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांनी नागरिकांच्या भेटीसाठी ठरलेली वेळ स्पष्टपणे फलकावर लिहावी, असे निर्देशही चंद्रशेखर यांनी दिले.