इर्शाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

By Raigad Times    14-Apr-2026
Total Views |
 khalapur
 
खालापूर | खालापूर तालुक्यातील इर्शाळगडावर ट्रेकिंग गेलेल्या एका तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. आकाश वाघमोडे (वय २६) असे या तरुणाचे नाव असून तो भिवंडी येथील रहिवासी होता. आकाश रविवारी (१२ एप्रिल) इर्शाळगडावर सोलो ट्रेकिंगसाठी आला होता.
 
ट्रेकिंगदरम्यान तोल जाऊन तो दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आकाशची मोटारसायकल इर्शाळगडाच्या पायथ्याशी आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. खालापूर पोलीस तसेच खोपोली येथील हेल्प फाऊंडेशनच्या मदतीने सोमवारी (१३ एप्रिल) शोधकार्य राबविण्यात आले.
 
अखेर दरीत आकाशचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तरुणांनी ट्रेकिंगदरम्यान विशेष काळजी घ्यावी, तसेच शक्यतो सोलो ट्रेकिंग टाळून ग्रुपमध्ये सुरक्षितरित्या भटकंती करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.