कळंबोलीजवळ अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By Raigad Times    11-Apr-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल । कळंबोली सर्कल परिसरात सुरू असलेल्या रस्ते विस्ताराच्या कामामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात 42 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. फुरकान नासीर पटेल असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
 
वेल शहरातील पटेल मोहल्ला येथे राहणारे फुरकान पटेल हे गुरुवारी (9 एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास तळोजा येथील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून काम आटोपून घरी परत येत होते. कळंबोली सर्कल परिसरात रस्ते विस्ताराचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला होता व योग्य ती खबरदारी न घेतल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
या अपघातात फुरकान पटेल यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरू असून रस्ते कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.