माणगावजवळ एसटी बसची धडक; पादचार्‍याचा मृत्यू

By Raigad Times    11-Apr-2026
Total Views |
alib ag
 
अलिबाग । मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील रुद्रवली गावाच्या हद्दीत एसटी बसच्या धडकेत एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास सीएनजी पेट्रोल पंपाजवळ गोवा बाजूकडे जाणार्‍या मार्गावर घडली.
 
या अपघातात सागर साहदेव शिगवण (वय 35, रा. गणेशवाडी, पो. वीर, ता. महाड) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिगवण हे रस्ता ओलांडत असताना एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 3814 वरील चालकाने बस अतिवेगाने व बेदरकारपणे चालवत त्यांना जोरदार धडक दिली.
 
या धडकेत शिगवण यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित बस चालकाविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 107/2026 नोंदविण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कलम 184 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 281, 125 (अ) व 125 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे करीत आहेत.