पनवेल | नवी मुंबई पोलिसांनी तब्बल १८ कोटी ६३ लाख ३४ हजार २६६ रुपयांच्या किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले. हे अंमली पदार्थ ५५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले होते. तळोजा येथील शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
मागील तीन वर्षांत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करून ड्रग्ज विक्री करणार्या आफ्रिकन नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत १५२२ जणांना हद्दपार करण्यात आले असून १११ जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. तसेच अमली पदार्थ विक्रीत सक्रिय सहभाग आढळलेल्या आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पंजाब राज्यातून नवी मुंबईत येऊन हॉटेल, लॉज व पीजीमध्ये राहून ट्रक आणि रेल्वेमार्गे अमली पदार्थांची वाहतूक करणार्या टोळीचाही पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात १६ गुन्हे दाखल करून ३३ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ४ कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या किमतीचे हेरॉईन, अफू, मेफेड्रोन आणि कोडीनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून मुख्य सूत्रधाराला पंजाब राज्यातून अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई | सानपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हेरॉईन वितरण करीत असलेल्या महिलेला अटक करण्यात यश आली आहे. अटक केलेली महिला फातिमा अल्लाउद्दीन शेख (वय ३९, वडाळा) असून तिच्याकडून ३७.६५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याचे बाजार मूल्य सुमारे १८ लाख ९२ हजार ५०० रुपये आहे. न्यायालयाने तिला सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सानपाडा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक संजय धारेराव, पोलीस हवालदार संतोष बडे, सुनिल चव्हाण, राहुल सुर्यवंशी, संदीप पवार आणि पोलीस शिपाई गणेशकुमार करवर यांनी रेल्वे स्टेशनजवळील बस डेपो गेटसमोरील संशयास्पद हालचाली करीत असलेल्या महिलेला पाहिले.
रात्रीची वेळ आणि महिला असल्याने ताबडतोब झडती घेता आली नाही. पुढील दिवशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी देविदास कठाळे व महिला पोलीस निरीक्षक सविता कटके यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्या ताब्यातून ३७.६५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आली,