म्हसळा | राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ११ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका तर ३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार, तहसिलदार कार्यालयाद्वारे निवडणुकीची नोटीस ३० मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी ७ एप्रिल ते १३ एप्रिल असा असेल. नामनिर्दे शनपत्रांची छाननी १४ एप्रिल २०२६ रोजी होईल, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल २०२६ आहे. त्यानंतर, १७ एप्रिल रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
मतदान प्रक्रिया आवश्यक असल्यास २८ एप्रिल २०२६ रोजी पार पडेल आणि मतमोजणी व निकाल जाहीर होईल २९ एप्रिल २०२६ रोजी जाहीर जाईल. सार्वत्रिक निवडणुकींमध्ये मांदाटणे, तुरुंबाडी, आंबेत, मेंदडी, रोहिणी, कोळे, खामगाव, खारगाव खुर्द, खारगाव बुद्रुक, गोंडघर आणि चिखलप या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पोटनिवडणुका केल्टे, पाभरे आणि लिपणीवावे या ३ ग्रामपंचायतींमध्ये होणार आहेत. या निवडणूक कार्यक्रमामुळे म्हसळा तालुक्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे.