स्कुटीचा अपघात; दोघांचा मृत्यू

By Raigad Times    02-Mar-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल | पनवेल लेनवर कोन बिट पोलीस चौकी समोरून जाणार्‍या ट्रेलरला समोरून स्कुटी चालकाने ठोकर दिल्याने स्कुटीवरीळ दोघांचा मृत्यू झाला आहे.
 
असद मेमन शमशद (वय १९ वर्षे, व्यवसाय रा. सिवुड्स) हा त्याच्या ताब्यातील स्कुटी गाडी घेऊन त्याची मैत्रीेन मुस्कान संजय सिंग (वय २०, रा.नेरुळ) हिला घेऊन पनवेल लेनवर कोन बिट पोलीस चौकीसमोरून जाणार्‍या ट्रेलरला समोरून उजव्या बाजूने स्वतःहून जाऊन स्कुटी चालकाने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीर रित्या जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.