नवी मुंबईत १३ कोटींचा गांजा जप्त; तीनजण अटकेत

By Raigad Times    27-Feb-2026
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई | वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३ कोटी ५० लाख रुपये किमतीचा १३ किलो हायड्रो गांजा जप्त केला असून, तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
 
गुप्त माहितीच्या आधारे सापळा: वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. अटकेतील तिघांपैकी दोनजण पुण्यातील आहेत, तर एक उल्हासनगरचा आहे.
 
जप्त करण्यात आलेल्या १३ किलो हायड्रो गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे १३ कोटी ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.