वडखळजवळ दुचाकीला अपघात; एकाचा मृत्यू; महिला जखमी

By Raigad Times    26-Feb-2026
Total Views |
 pen
 
पेण | मुंबई-गोवा महामार्गवर पेणकडून नागोठणेकडे जाणार्‍या दुचाकी स्वाराला एका सिमेंट मिक्सर चालकांने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. महेश बाळकृष्ण जाधव (रा. पन्हळघर, माणगाव) असे मृताचे नाव आहे.
 
महेश आणि सुजाता जाधव हे दोघे पेणकडून नागोठणेच्या दिशेने जात होते. ते जेएसडब्ल्यू कंपनीच्या गोवा गेटसमोरील पुलावर आले असता, सिमेंट मिक्सर टँकर चालकाने धडक दिली. यात महेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुजाता महेश जाधव या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची नोंद वडखळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.