कर्जत | रायगड जिल्हा परिषदेचे निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे पाच सदस्य निवडून आले आहेत. या पाच सदस्यांनी आपला गट नेते म्हणून कर्जत तालुक्यातील कडाव गटामधून निवडून आलेले मारुती तथा बाबू घारे यांची निवड केली आहे. या पक्षाकडून आपली गटाची निवड रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आली.
रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना ठाकरे गट उरण आणि पेण तालुक्यात महाविकास आघाडीमधून तर कर्जत आणि खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट अशी परिवर्तन आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले.
कर्जत आणि खालापूर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाने तीन जागा लढवल्या आणि तिन्ही जागांवर यशमिळवले. या पाच सदस्यांच्या गटाची गटनोंदणी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. या पाच सदस्यांनी आपला गटनेता म्हणून कर्जत तालुक्यातून निवडून आलेले मारुती तथा बाबू घारे यांची निवड केली.
त्यानुसार गट नोंदणी प्रक्रिया रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि कर्जत उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी आदी उपस्थित होते.