अलिबाग । दिवाळीच्या सुट्टीत अंगणात, गच्चीवर किंवा सोसायटीच्या आवारात गड-दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.
ही परंपरा जपत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी स्वतः साकारलेल्या दुर्गाच्या प्रतिकृतीचे छायाचित्र किंवा सेल्फी काढून www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावे. नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे.
उपक्रमात सहभागी होणार्या प्रत्येकाला म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, तरुण, पालक, शिक्षक तसेच सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा व्यवस्थापक : 9112228759, शैलेश मराठे : 9423892182, मंगेश ढेबे : 8149552143 यांच्याशी संपर्क साधावा.