टोरंटसाठी जंगलतोड; भाजप पदाधिकार्‍याचा राजीनामा , मिनेश मसणे यांचा पदासह प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग

By Raigad Times    13-Nov-2026
Total Views |
karjat
 
 कर्जत | कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित हायड्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूीवर भाजपच्या आणखी एका पदाधिकार्‍याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा कोषाध्यक्ष मिनेश मसणे यांनी पक्षाच्या पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
 
पर्यावरणाचा र्‍हास उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका समाजमाध्यमांवरून जाहीर केली आहे. कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या हायड्रो प्रकल्पामुळे पर्यावरण, वनसंपदा आणि स्थानिकांच्या हितासंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र बाधित होण्याची आणि वृक्षतोड होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणप्रेी, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून विरोध व्यक्त केला जात आहे.
 
या पार्श्वभूीवर प्रकल्पग्रस्त भागातील शेतकरी असलेल्या मिनेश मसणे यांनी मातृभू ीप्रती असलेली बांधिलकी आणि सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. आपण विकासाच्या विरोधात नसून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उद्योग, ऊर्जा आणि रोजगार आवश्यक असल्याची जाणीव असल्याचे मसणे यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत असेल, तर त्याला समर्थन देणे शक्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
 
सत्तेतील सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करण्यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही. पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी आवाज उठवताना पक्षीय चौकटीत राहून भूमिका मांडणे योग्य वाटत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सह्याद्रीशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करताना मसणे यांनी म्हटले आहे की, सह्याद्री ही केवळ डोंगररांग नसून म हाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि इतिहासाचा साक्षीदार आहे.
 
याच भूीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवून प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे सह्याद्रीची हानी हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून पुढील पिढ्यांच्या भवितव्याशी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित विषय आहे. पदापेक्षा तत्त्व मोठे आणि राजकारणापेक्षा मातृभूी महत्त्वाची, या भूमिकेतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा निर्णय राजकीय प्रवासाचा शेवट नसून सह्याद्री, पर्यावरण आणि नागरिकांच्या हक्कांसाठी स्वतंत्रपणे लढण्याची सुरुवात असल्याचेही मसणे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.