खोपोली | डॉक्टरांना मारहाण करून रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केल्याची घटना खोपोली शहरातील शास्त्रीनगर येथील सुमित्राराज हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी प्रसूती झालेल्या आपल्या मुलीला आणि तिच्या दहा दिवसांच्या बाळाला वैद्यकीय उपचारांसाठी सुमित्राराज हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. बाळाला कावीळ असल्याने फिर्यादी डॉक्टरांनी त्याला औषध दिले होते.
मात्र, औषध दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा गैरसमज नातेवाईकांचा झाला. त्यातून त्याने फिर्यादी डॉक्टरांना मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे करीत आहेत.