रायगडातील दुष्काळी परिस्थितीवरही लक्ष

By Raigad Times    07-Oct-2026
Total Views |
mahad
 
महाड | रायगड जिल्ह्यात निर्माण दुष्काळी परिस्थितीवर लक्ष असून, परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री ना.गोगावले यांनी स्पष्ट केले. बाधित शेतकर्‍यांना नियमानुसार आवश्यक ती मदत दिली जाईल. यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
 
रोजगारासाठी मजुरांनी स्थलांतर करू नये, असे आवाहनही गोगावले यांनी केले. स्थानिक पातळीवरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून घेऊन रोजगार मिळवावा, असे त्यांनी सांगितले. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेनंतर मदतीचा निर्णय आणि दुसर्‍या बाजूला अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व मजुरांसाठी शासनाची उपाययोजना, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे.