रोहा-बारसोली गावाजवळ टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By Raigad Times    06-Oct-2026
Total Views |
roha
 
रोहा | रोहा तालुक्यातील बारसोली गावाच्या वळणावर टँकर मागे घेत असताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
 
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बारसोली गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील वळणावर चालक सोहनलाल कानिया मीना (वय ३४, रा. डुंगारपूर, राजस्थान) हा टँकर मागे घेत होता. यावेळी हा अपघात झाला.
 
या अपघातात अजय सुभाष सरकार या तरुणाचा मृत्यू झाला. तो मूळचा पश्चिम बंगाल येथील असून सध्या धाटाव, ता. रोहा येथे राहत होता.