पनवेल | पनवेल तालुक्यातील नानोशी गाव परिसरात सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. नानोशी गाव परिसरात भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर स्थानिक पातळीवर माहिती घेण्यात आली.
मात्र, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार, पनवेल यांनी दिली आहे. भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.