अलिबाग | आदिवासी वाड्यावस्त्यांमधील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. विशेषतः कुपोषित बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या बालविकासविषयक योजनांचा लाभ वेळेत मिळवून द्यावा, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले.
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे हे दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. या दौर्यादरम्यान त्यांनी अलिबाग तालुक्यातील आदिवासी वाडी सांगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आदिवासी समाजातील लहान मुलांशी संवाद साधत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीचे महत्त्व पटवून दिले.
बालकांनी नियमितपणे अंगणवाडीत जावे, तसेच त्यांना मिळणार्या पोषण आहारासह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. या दौर्यात अध्यक्ष महेश ढवळे यांनी हाशिवरे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच वाडगाव येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमित दवे यांनी केंद्र सरकारच्या घोषणांवर टीका केली. जनतेच्या मूलभूत प्रश्नांबरोबरच लोकशाहीचे रक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता हे मुद्देही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी कथित मतचोरीचा मुद्दा जनतेसमोर मांडल्यामुळे देशभरात या विषयावर चर्चा आणि जनजागृती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेचे नगरसेवक लतीफ शेख यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्द्यावर काँग्रेसच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला. हेमराज म्हात्रे यांनीही आंदोलनादरम्यान आपली भूमिका मांडली.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, ज्येष्ठ नेते, महिला पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी यशवंत सावळेकर, शशिकांत बांदोडकर, सुदाम पाटील, निर्मला मात्रे, हेमराज म्हात्रे, आदित्य सावळेकर, सुधीर मोरे, शाहिद मुल्ला, विकास भारतीय, राजाभाऊ दवे, सागर पगारे, अमित जगनाडे, आरती ठाकूर, नीता शेनॉय, अलका ठाकूर, चैताली ठाकूर आणि सुनंदा घरत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.