रोहा | कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्य

By Raigad Times    27-Oct-2026
Total Views |
 roha
 
धाटाव | मुंबई-गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर टाटा कारने सायकलला पाठी मगून धडक दिल्याने सायकलस्वाराचा मृत्यू झाला. रवींद्र विठ्ठल मांजरे (वय ४८, रा. गोवे, ता. रोहा, जि. रायगड) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे.
 
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी हा अपघात घडला. रवींद्र मांजरे हे आपल्या सायकलवरून गोवे गावाकडे जात होते. त्याचवेळी गिरीश मोहन जाधव (वय ५०, रा. काळाचौकी, मुंबई) हे एमएच ०१ ईआर ८०१७ क्रमांकाची टाटा कार घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. कारचालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने कारची सायकलला पाठीमागून धडक बसली. या अपघातात मांजरे यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.