पनवेल | भाजप उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीअंतर्गत पनवेल उत्तर मंडलातील विविध पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या नवनियुक्त पदाधिकार्यांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी भाजपचे प्रदेश सचिव आ.प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील उपस्थित होते. भाजप उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीच्या पनवेल उत्तर मंडल चिटणीसपदी गोविंद पाटील, मंडल उपाध्यक्षपदी नितीन भोईर आणि प्रथमेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच अमित रॉय यांच्याकडे उत्तर भारतीय कामगार आघाडीच्या अध्यक्षपदाची, विघ्नेश पाटील यांच्याकडे एमआयडीसी उपाध्यक्षपदाची, तर अनिरुद्ध पाटील यांच्याकडे उत्तर मंडल सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीपत्रे प्रदान करताना रामशेठ ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना कामगारांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा उत्तर कामगार आघाडीचे अध्यक्ष रविंद्र नाईक, पनवेल तालुका उत्तर मंडल अध्यक्ष हरेश पाटील, उपेंद्र मराठे, कार्यालयीन चिटणीस मधुकर उरणकर, सहचिटणीस बाळाराम पाटील, प्रसिद्धीप्रमुख राजपाल शेगोकार, सदस्य श्याम भगत आणि सचिव मोहन घाडगे आदी उपस्थित होते. या नियुक्त्यांमुळे कामगार आघाडीच्या संघटनात्मक कामाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.