खोपोलीच्या पाणीप्रश्नावर लवकरच तोडगा निघणार , जलसाठवण तलावाच्या उभारणीसाठी हालचाली सुरु

पालकमंत्री गोगावले यांच्याकडून जागेची पाहणी

By Raigad Times    26-Oct-2026
Total Views |
khopoli
 
खोपोली | खोपोली शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित जलसाठवण तलावाच्या उभारणीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. या पोर्शभूमीवर रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी शनिवारी, २४ ऑटोबर रोजी मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
 
या जागेवर जलसाठवण तलाव उभारण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेत लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे ओशासन त्यांनी दिल्याची माहिती खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी दिली.खोपोली शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, भविष्यात नागरिकांची पाण्याची गरज वाढणार आहे. ही गरज लक्षात घेऊन शहरातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर जलसाठवण तलाव उभारण्याचा प्रस्ताव नगरपालिकेकडून पुढे आणण्यात आला आहे.
 
या जागेचा वापर करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी आणि प्रकल्पासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी नगराध्यक्ष कुलदीप शेंडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.यासंदर्भात त्यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडेही या प्रस्तावासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.
 
शनिवारी पालकमंत्री खोपोलीत खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी संबंधित जागेची पाहणी करून प्रस्तावाचा आढावा घेतला. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खोपोली शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शहराचा प्रमुख जलस्रोत असलेल्या पेशवेकालीन शंकर तलावातील पाणीसाठा मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच टाटा पॉवर कंपनीकडून होणार्‍या पाणीपुरवठ्यात भविष्यात काही कारणास्तव खंड पडल्यास शहरासमोर पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते.
 
ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पर्यायी जलसाठ्याची व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे नगरपालिकेचे म्हणणे आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर जलसाठवण तलाव उभारल्यास शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याची व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विेशास नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी व्यक्त केला.
 
या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या आणि निधी उपलब्ध होऊन काम लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या पाहणीप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, खालापूर पंचायत समितीचे उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, नगरसेवक हरीश काळे, नगरसेवक राहुल गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मयूर रेटरेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शहराच्या वाढत्या पाण्याच्या गरजेच्या पोर्शभूमीवर या प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते? याकडे आता खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे.