मुंबई | टाटा मोटर्सच्या डिझेल एक्झॉस्ट फ्लुईड उत्पादनाच्या कथित बनावट विक्रीप्रकरणी पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा परिसरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वराज ऑटोमोबाईल आणि साईप्रसाद स्पेअर पार्ट्स या ठिकाणांशी संबंधित या प्रकरणात पोलिसांनी नऊ प्लास्टिक बकेट जप्त केल्या असून, त्यांची एकूण किंमत ३२ हजार ८९५ रुपये आहे.
मारुती हरिभाऊ सुर्वे (वय ५४) आणि कैलास गोपीनाथ भोपे (वय ४४) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाण फाटा परिसरातील स्वराज ऑटोमोबाईल आणि साईप्रसाद स्पेअर पार्ट्स येथे टाटा मोटर्सच्या डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड उत्पादनाच्या विक्रीसंदर्भात कारवाई करण्यात आली.
या कारवाईत संबंधित उत्पादनाच्या नऊ प्लास्टिक बकेट जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ३२ हजार ८९५ रुपये असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ व ६३ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३४५(३) आणि ३४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.