दिबा पाटील यांच्या नावासाठी भूमिपूत्र पुन्हा आक्रमक...नवी मुंबई विमानतळ बंद पाडण्याचा निर्धार

दिबांच्या जन्मगावातून दिली निर्णायक आंदोलनाची हाक;आमदार-खासदारांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा इशारा

By Raigad Times    25-Oct-2026
Total Views |
uran
 
उरण | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने देऊनही नामकरणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता निर्णायक आंदोलन छेडण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे.
 
पुढील दोन ते तीन महिन्यांत आंदोलनाची रणनीती आखून गावागावांत जनजागृती व जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असून, विमानतळ बंद पाडण्यासह तेथे जाणारी वाहने रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.उरण तालुक्यातील लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जन्मगावी जासई येथे शनिवारी (२४ ऑक्टोबर) नामकरण आंदोलनासंदर्भात निर्णायक बैठक पार पडली.
 
समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा आणि नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. पुढील तीन महिन्यांत गावागावांत जाऊन भूमिपुत्रांशी संपर्क साधत मोठ्या जनआंदोलनाची उभारणी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शासनाने यापूर्वी अनेकदा आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप बैठकीत उपस्थित भूमिपुत्रांनी केला.
 
त्यामुळे केवळ निवेदने आणि आश्वासनांवर अवलंबून न राहता तीव्र आंदोलन उभारण्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. विमानतळ बंद पाडणे आणि विमानतळाकडे जाणारी वाहने रोखणे, या मार्गानेच शासनाचे लक्ष वेधता येईल, असा दावा आंदोलकांनी केला.
 
आमदार-खासदारांच्या घरांवर मोर्चाचा इशारा
विमानतळाच्या नामकरणाच्या प्रश्नावर आगरी समाजातील आमदार आणि खासदारांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास संबंधित आमदार-खासदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा निर्वाणीचा इशारा आंदोलकांनी दिला. ‘बंदुकीच्या गोळ्या खाऊ, मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही,’ असा ठाम निर्धारही भूमिपुत्रांनी व्यक्त केला.
 
सर्वपक्षीय नेते व प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, नगराध्यक्षा भावना घाणेकर, कामगार नेते भूषण पाटील, उरण समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, उरण पंचायत समिती सदस्य नरेश घरत,उरण बायपास पुलामुळे उरण शहर आणि रेल्वे स्थानकादरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे.
 
त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचण्यासह परिसरातील वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. नैना क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. या उपक्रमांमुळे नियोजनबद्ध शहरी विकासाला गती मिळण्यासह नागरिकांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.