कर्जत । कर्जत-खालापूर मतदारसंघात औद्योगिक क्षेत्रातील कामांच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले. कंपनीतील कामे आणि रोजगाराच्या संधीवरुन ‘50-50’ फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादीचे मित्रपक्ष मात्र नाराज होऊन बसले असल्याची चर्चा आहे.
परिणामी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना गुरुवारी (22 ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. खालापूर तालुक्यातील एका कंपनीसंदर्भात तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीतील कथित वादानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी औद्योगिक वसाहतीतील कामांसाठी ‘50- 50’ फॉर्म्युला जाहीर केला. यावेळी दोघांनीही राजकिय वैर सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
मात्र राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि आमदार थोरवे यांच्यातीन सेटलमेंट चर्चेचा विषय ठरले. राष्ट्रवादीला साथ देणार्या मित्रपक्षांना त्यांची ही भूमिका फारशी रुचली नाही. ‘50-50’ फॉर्म्युल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्रपक्षांना किती वाटा मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला. कर्जत परिवर्तन आघाडीतील घटक पक्षांसह इतर सहकार्यांना कोणती संधी मिळणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला. दुसरीकडे, आमदार थोरवे यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांनी या भूमिकेबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली नसल्याचे चित्र होते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारा 50 टक्के वाटा हा पक्षासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरणार की मित्रपक्षांच्या नाराजीला कारणीभूत ठरणार, याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सर्वांनी एकत्र काम करायचे असून, सर्वांना संधी दिली जाईल, अशी भूमिका मांडली. तरीही कामांच्या वाटपाचा प्रश्न कायम चर्चेत राहिला. अखेर गुरुवारी सकाळी नऊ वाजता घारे यांनी काही निवडक पत्रकारांना बोलावून पत्रकार परिषद घेतली आणि 50 टक्के वाटा हा सर्व सहकार्यांचा असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी, विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आघाडी आबाधित आहे.स्थानिका तरूणांनी रोजगार मिळवून देण्यासाठी एकत्र लढत आहोत. एल अँण्ड टी कंपनीत स्थानिकांना काम देण्यासाठी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढता आमदार थोरवे यांच्याशी चर्चा करताना 50 टक्के कामाचा फार्म्युला ठरला आहे. त्यानुसार आमच्यासोबत असलेल्या शेकाप, उबाठा, काँग्रेस, मनसे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करू, असे घारे यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांमध्ये 50 टक्के काम घेण्याचा माझा कोणताही हेतू नाही. आजपर्यंत मी कोणत्याही कंपनीत चहासुद्धा प्यायलेलो नाही. माझा व्यवसाय वेगळा आहे. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा आणि सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना कंपन्यांमध्ये कामाच्या संधी मिळाव्यात, यासाठी मी लढत आहे. एल अँड टी कंपनीत स्थानिकांना काम मिळावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांदरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी चर्चा झाली. भविष्यात कंपन्यांमध्ये कामाच्या संधी उपलब्ध झाल्यास आमच्यासोबत असलेल्या शेकाप, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस केला जाईल आणि मनसेसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचाही विचार - सुधाकर घारे, राष्ट्रवादी, जिल्हाध्यक्ष