राज्यातील शाळांना दिवाळीची 15 दिवसांची सुट्टी

By Raigad Times    23-Oct-2026
Total Views |
 pune
 
पुणे । यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दिवाळीची सुट्टी असेल. दिवाळीची सुट्टी सोमवार, 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
 
शनिवार, 31 ऑक्टोबर आणि रविवार, 1 नोव्हेंबर या दिवसांनंतर सुट्टी सुरू होत असल्याने, ज्या शाळांना शनिवारी सुट्टी असते, तेथील विद्यार्थ्यांचा शेवटचा शाळेचा दिवस शुक्रवार, 30 ऑक्टोबर असेल. दिवाळीच्या सुट्टीनंतर रविवार, 15 नोव्हेंबर असल्याने शाळा सोमवार, 16 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होतील.