मुंबई | विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवारी (२० ऑक्टोबर) शिवसना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना दिल्या जाणार्या आर्थिक मदतीवरूनही ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. "गद्दारांना ५० कोटी रुपये देता आणि शेतकर्यांना पाच हजार रुपये देता.
तुची खुर्ची टिकवण्यासाठी ५० कोटी रुपये देता आणि ज्यांच्यामुळे अन्न खाता, त्यांना केवळ पाच हजार रुपये देता,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, अतिवृष्टीवेळी सर्वात मोठं पॅकेज असं मुख्यमंत्री म्हणाले होते. नमो किसान योजनेचे ३ हफ्ते शेतकर्यांना मिळाले नाही. शेतकर्यांच्या तोंडावर ५ हजार रुपये फेकून मारले. सहलीला पैसे नाहीत म्हणून एका मुलाने आत्महत्या केली. हे सरकार केवळ घोषणा करत आहे.
कर्जाफी जाहीर केली, पण किती जणांना मदत केली? यानंतर त्यांनी टायगर श्रोफवर झालेल्या गोळीबारावरही वक्तव्य केले आहे. यावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणविसांना खुलं आव्हान दिलं आहे. राज्यातील दुष्काळाचं संकट यंदा गंभीर असून, येत्या काळात त्याचं स्वरूप आणखी भीषण होऊ शकतं, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. दुष्काळात तेरावा महिना असावा, अशी राज्य सरकारची परिस्थिती असल्याचं म्हणत त्यांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.
सरकार केवळ घोषणा करत असून, प्रत्यक्षात शेतकर्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मागील वेळी आपण दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला होता, याची आठवण करून देत त्यांनी सरकारच्या मदतीवर नाराजी व्यक्त केली. शेतकर्यांच्या हातात पाच हजार रुपये देऊन प्रश्न सुटणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं. पीकविम्याच्या निकषांवरही त्यांनी आक्षेप घेतला. नुकसानभरपाई मिळू नये, यासाठीच हे निकष बदलवण्यात आले असा आरोप त्यांनी केला.
केंद्राचं पथक राज्यात आलं, मात्र त्यानंतर नेकी काय कारवाई झाली, याबाबत प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी पीकविम्याचा लाभ किती शेतकर्यांना मिळाला, याची माहिती मागितली. दुष्काळाच्या संकटात शेतकर्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार घोषणां ध्येच गुंतल्याची टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात आहे. बिश्नोई साबरमतीम ध्ये फाफडा आणि ढोकळा खात आहे. देवेंद्र फडणवीसां ध्ये हिंम्मत असेल तर साबरमती जेलमधून इथे आणावं. महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र म्हणताना जीभ झडत नाही का? मोदी आणि शहांनी १२ वर्ष देशाला छळलं आहे. आंदोलनाआधी पोलीस नोटीस पाठवत आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात
विजयादशमीच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. या मेळाव्यांतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. राज्यातील राजकीय घडामोडी, भाजप, काँग्रेस, शेतकर्यांना दिली जाणारी आर्थिक मदत आणि संविधानासह विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी आपापली भूमिका मांडली.
भाषण नाही शेतकर्यांना राशन देणारे आम्ही - एकनाथ शिंदे
मुंबई | गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील सध्याच्या दुष्काळावर सविस्तर भाष्य केलं. आम्ही शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या पाठीशी आहोत, असे शिंदे यावेळी म्हणाले. तसेच आम्ही भाषण नाही तर शेतकर्यांना राशन देणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली.
शेतकर्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. एकनाथ शिंदे करून दाखवणारा माणूस आहे. सध्या राज्यात दुष्काळ आहे. पण शेतकर्यांनी चिंता करू नये. आम्ही शेतकर्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकर्यांच्या पाठीशी मी खंबीर आहे.
आज बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे असते तर सण उत्सव बाजूला ठेवा आणि शेतकर्यांच्या मदतीला धावा, असे ते म्हणाले असते. तेच आम्ही करतो आहेत. आम्ही परभणीत २५ हजार शिलाई मशिनींचे वाटप केले. आम्ही शेतकर्यांच्या मुलींना २५००० सायकलींचे वाटप करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला.
ज्या शेतकर्यांच्या मुलीचे लग्न असेल त्या लेकीचे लग्न करण्याची जबाबदारी शिवेसनेने घेतली आहे. सामूहिक विवाहसोळे आयोजित केले जातील. शिवसेना कुठेही मागे राहणार नाही. दरम्यान आपल्या भाषणात शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. आम्ही शेतकर्यांना मदत करतो. असा टोला शिंदे यांनी लगावला.