भावकीतील देवकाच्या वादातून हाणामारी ; महाड बिरवाडी येथील एक जण जखमी, चौघांविरोधात गुन्हा दाखल

By Raigad Times    20-Oct-2026
Total Views |
 mahad
 
महाड | महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरवाडी येथे भावकीतील देवकाच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अरविंद कारंडे (वय २८, रा. मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुारास मौजे बिरवाडी येथे ही घटना घडली. घटनेच्या दिवशी आरोपींपैकी एकाने गोपाळ गंगाराम कदम (वय ५२, रा. सिद्धी कॉम्प्लेक्स, महाड) यांना मोबाईलवर फोन करून वाद घातला.
 
त्यानंतर भीमराव नारायण कदम (वय ४५), शोभा भीमराव कदम (वय ४२, दोघे रा. आदर्शनगर, बिरवाडी), हेमंत कृष्णा केळशीकर (वय ३२) आणि कृष्णा पांडुरंग केळशीकर (वय ५२, दोघे रा. ढालकाठी, ता. महाड) यांनी संगनमत करून गोपाळ कदम यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.