महाड-पोलादपूर तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By Raigad Times    02-Oct-2026
Total Views |
mahad
महाड | महाड व पोलादपूर तालुक्यांत अपुर्‍या पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, दोन्ही तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाडच्या प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
 
अपुर्‍या पावसाचे प्रमाण, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच ग्रामीण भागातील जनजीवनावर होणारे परिणाम याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
 
यावेळी सुभाष निकम, चंद्रकांत बुबा जाधव, निलेश महाडिक, मयूर जाधव, रिहान देशमुख, रिजवान माणिकवारे, चंद्रकांत आंबा महाडिक, राजेश जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने परिस्थितीची पाहणी करावी, अशी अपेक्षा पक्षाच्यावतीने व्यक्त करण्यात आली.