महाड नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा 7 जानेवारीला

By Raigad Times    05-Jan-2026
Total Views |
 mahad
 
महाड । महाड नगरपरिषदेच्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचे नाव शासकीय गॅझेटमध्ये नोंद झाल्यानंतर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष यांच्या पत्रानुसार ही निवडणूक बुधवार, 7 जानेवारी रोजी होणार आहे.
 
उपाध्यक्षपदासाठी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्दे शनपत्रे सादर करता येणार असून दुपारी 1 वाजता छाननी केली जाईल. त्यानंतर 15 मिनिटांत अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात येणार आहे. सध्याच्या नगरपरिषदेत राष्ट्रवादीभाजप युतीचे 12, तर शिवसेनेचे 8 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष असे 9 सदस्य आहेत.