नवीन पनवेल । नवीन पनवेलमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांच्या रॅलीदरम्यान तिनजणांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नवीन पनवेल येथे राहणारे जय चंद्रन के. वासू हे उमेदवार विजयी झाल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी वडाळे तलाव परिसरात विजय रॅली काढली.
ही रॅली सुरू असताना जय वासू यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन गळ्यातून चोरीला गेली. याच रॅलीदरम्यान नवीन पनवेल येथे राहणार्या शैला चनवीर यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच नवीन पनवेल येथे राहणार्या निलेश पगारे यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची चैनही अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.