खालापूरातत चोरट्यांचा हैदोस : रात्रीत तीन घरे फोडली , 20 तोळे सोने व अडीच लाखांची रोकड चोरीला

तीन घरफोड्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

By Raigad Times    30-Sep-2025
Total Views |
khapur
 
खालापूर । खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या डोलवली गावात 28 सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडून मोठ्या प्रमाणात चोरी केली. या चोरीत जवळपास 20 तोळे सोने आणि अडीच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. 16 ऑगस्टच्या रात्रीची चोरी अजून ताजी असतानाच, या नव्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भय वाढले आहे.
 
चोरट्यांनी घरात कोणी नसताना दरवाजे फोडून प्रवेश केला आणि सोन्यासह हार, आंगठ्या, कानातले, झुमके, चैन, मंगळसूत्र अशा दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. जावेद खान यांच्या घरातून जवळपास 20 तोळे सोने व अडीच लाखाची रोकड गायब झाली, तर गोपाल प्रजापती आणि युनुस शेख यांचीही काही रक्कम चोरी झाली. खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
 
ग्रामस्थांनी सांगितले की, चोरट्यांनी मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरी केली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घराबाहेर जाताना मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घरात ठेवू नका, अन्यथा चोरीस धोका निर्माण होतो असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.