पूरग्रस्तांसाठी पनवेलमधील जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे मदतीचे आवाहन

By Raigad Times    30-Sep-2025
Total Views |
 Panvel
 
पनवेल । राज्यातील पूरग्रस्तांसाठी पनवेलमधील जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने मदतीचे आवाहन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे म्हणाले, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अत्यंत गरजेची आहे. आपल्या छोट्याशा मदतीनेही एखाद्या कुटुंबाला नवी दिशा मिळू शकते.
 
पनवेलमधील जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले की, “एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत एका लहान चिमुरडीने माझे शालेय साहित्य वाहून गेले, मला जगायचे आहे अशी साद व्यक्त केली. त्या चिमुरडीचे शब्द ऐकून मन हेलावले. अशा परिस्थितीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीची आज अत्यंत गरज आहे. असे म्हटले आहे.