टॉप क्लास शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी ! ओबीसी, ईबीसी, डीएनटी विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

By Raigad Times    24-Sep-2025
Total Views |
 Alibag
 
अलिबाग । केंद्र शासनाच्या टॉप क्लास एज्यूकेशन इन स्कूल योजनेकरिता ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
 
कारण निवडक नववी ते बारावी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च शासकीय योजनेतून मिळणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी दिली आहे.
अटी व नियम
* आधार लिंक केलेली उपस्थिती प्रणाली आवश्यक.
* नियमित उपस्थिती व समाधानकारक शैक्षणिक प्रगती अनिवार्य.
* इतर शासकीय योजनेंतर्गत दुहेरी लाभ घेता येणार नाही.
पात्रता व निवड प्रक्रिया
प्रवर्ग : ओबीसी, ईबीसी, डीएनटी
वार्षिक कुटुंबीय उत्पन्न : कमाल 2 लाख 50 हजार रुपये
निवड पद्धत : मागील वर्गातील गुणांवर आधारित मेरिट यादी
आरक्षण : किमान 30% जागा मुलींसाठी राखीव
शाळांची निवड : सलग वर्षांमध्ये 100% निकाल देणार्‍या रायगड जिल्ह्यातील निवडक टॉप क्लास शाळांची यादी कोडद्वारे उपलब्ध.
वर्गनिहाय आर्थिक मदत
इयत्ता नववी-दहावी :
वार्षिक मदत । 75,000
समाविष्ट घटक । शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी, पुस्तके, गणवेश इ.
निवड । आठवी व नववीच्या गुणांवर आधारित
इयत्ता अकरावी-बारावी:
आर्थिक मदत । 1,25,000
समाविष्ट घटक । शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, कोचिंग फी इ.
निवड । दहावी व अकरावीच्या गुणांवर आधारित
अर्ज प्रक्रिया
* राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज
* शाळा नोडल अधिकार्‍यांकडून ऑनलाईन पडताळणी
* राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी
* मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी
* शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा