कर्जतमधील खड्डे मुक्त रस्त्यासाठी साखळी उपोषण सुरु

By Raigad Times    23-Sep-2025
Total Views |
 karjat
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील आंबोट-गौळवाडी अंतर्गत रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी व या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे म्हणून ग्रामस्थांनी घटस्थापनेच्या दिवशी गसाखळी उपोषण सुरु करण्याचीवेळ आली. आंबोट- गौळवाडी अंतर्गत रस्ता खड्डे मुक्त व नुतनीकरण करण्यासाठी पोलीस मित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली आंबोट ग्रामस्थांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
 
मुख्य म्हणजे पोटल ग्रामपंचायत, रायगड जिल्हा परिषद. सार्वजनीक बांधकाम विभाग म्हणतात हा रस्ता आमच्या अखत्त्यारीत येत नाही; पण या आधी सर्व बांधकाम विभागाने 1999 साली या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यामुळे या रस्त्याचे दुरुस्ती चेकाम सुरू करत नाही व नूतनीकरण कधी व किती दिवसात करणार ? असे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे.