मंत्री-अधिकार्‍यांना पदानुसार गाडी खरेदीची मर्यादा , राज्यपाल-मुख्यमंत्र्यांसाठी किमतीची मर्यादा नाही

By Raigad Times    19-Sep-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई । सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्री आणि अधिकार्‍यांच्या वाहन खरेदीसाठी रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आलीआहे. त्याचवेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वाहनासाठी मात्र किमतीची कोणतीही मर्यादा घालण्यात आली नाही.
 
महाराष्ट्र सरकारच्या अर्थ विभागाने राज्यातील शासकीय अधिकार्‍यांसाठी नवीन वाहन खरेदीबाबत महत्त्वपूर्ण आदेश जाहीर केला आहे. हा आदेश 17 सप्टेंबर 2025 पासून लागू झाला असून, याआधी जारी करण्यात आलेले सर्व जुने आदेश रद्द करण्यात आले आहेत.
 
वाढती उत्पादनखर्च, महागाई आणि बीएस- 6 मानकांच्या नवीन वाहनांच्या वाढलेल्या किमती या निर्णयामागील प्रमुख कारणे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.शासकीय अधिकारी त्यांच्या निर्धारितमर्यादेपेक्षा 20 टक्के जास्त किमतीपर्यंत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकतात.
 
आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित फील्ड ऑफिसर्सना 12 लाखांपर्यंत मल्टी युटिलिटी वाहन घेण्याची मुभा असेल. नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी महावाहन प्रणालीत जुन्या वाहनाला अधिकृतरीत्या स्क्रॅपघोषित करणे अनिवार्य आहे. हा आदेश केवळ शासकीय विभागापुरता मर्यादित नसून सर्व स्वायत्त संस्था, सरकारी कंपन्या, मंडळे आणि महामंडळे यांनाही लागू राहणार आहे.