म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे

राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता कायम

By Raigad Times    11-Sep-2025
Total Views |
 mhasla
 
म्हसळा । म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी जाहीर केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसची म्हसळा नगरपंचायतीत एकहाती सत्ता असून, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक व उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकार्‍यांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत दोघांचेही अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीकडून म्हसळा नगराध्यक्षपदासाठी फरीन बशारत आणि उपनगराध्यक्षपदासाठी अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, असहल कादीरी, जयश्री कापरे, नगरसेविका सरोज म्हशिलकर, सुनिलशेडगे, नगरसेवक नासीर मिठागरे, शाहीद जंजीरकर, सलीम बागकर, अजीज बशारत, नौसिन दळवी आदी उपस्थित होते.