हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी

By Raigad Times    09-Aug-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | यंदा देखील हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्दे श जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. अभियानाचा पहिला टप्पा ८ ऑगस्टपर्यंत, दुसरा टप्पा ९ ते १२ ऑगस्ट आणि तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट या तीन टप्प्यात करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाकडून सूचना आलेल्या आहेत.
 
हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच कार्यालयात, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.