कर्जत | कर्जत तालुक्यात वीज ग्राहक संघर्ष समितीकडून स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केला जात आहे. मात्र तरीही महावितरणकडूननेमण्यात आलेले ठेकेदार ग्राहकाला माहिती न देताच स्मार्ट मीटर बसवत आहेत. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरामध्ये महावितरण कंपनीने ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर न झाल्याने ग्राहक थेट पोहोचले महावितरण ऑफिस कर्जत तेथे पोहोचत असून ग्राहकांनी तेथील उपस्थित अधिकार्यांना जाब विचारून विचारणा केली.
कुणाची परवानगी घेतली आणि आमच्या घरी स्मार्ट मीटर लावले असे विचारणा केली, तसेच दुपारच्या वेळेत जाऊन स्मार्ट मीटर जोडणी केली ती कोणाची परवानगी घेतली का? कॉन्ट्रॅक्टरने आमचे मीटर चोरी केले आहेत असे आरोप ग्राहकांकडून करण्यात आले. याबद्दल महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी स्मार्ट मीटर हे कॉन्ट्रॅक्टरने लावले आहेत. त्यांना विचारावे लागेल असे उत्तर दिले. यावेळी ग्राहकांना न विचारताच स्मार्ट मीटर लावणार्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.