पनवेल महापालिकेवर शिवसेनेचा हल्लाबोल

By Raigad Times    07-Aug-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | पनवेल महापालिका अंतर्गत सर्व भागातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी व भ्रष्टाचारी कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
 
शिवसेैनिकांनी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पालिकेचे सुरक्षारक्षक व पोलिस प्रशासनाकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शिवसैनीकांनी रौद्र रूप धारण करत बॅरिगेट्स तोडून पालिकेत शिरकाव केला. यावेळी आयुक्त चितळे यांनी, सदर कामाची तपासणी करून गणेश उत्सवापूर्वी सर्व रस्त्यांची दुरूस्ती करून सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश व आश्वासन दिले.
 
मोर्चाचे आयोजन महानगरप्रमुख अवचित राऊत यांनी केले होते यावेळी प्रदीप ठाकुर, दिपक घरत, गुरुनाथ पाटील, संदीप तांडेल, प्रकाश गायकवाड, पराग मोहिते, प्रवीण जाधव, जितेंद्र सिद्धू, खारघर शहर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.