कर्जत | छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि धर्मवीर राजा होते. परंतु अलीकडे ‘खलिद का शिवाजी’ या चित्रपटाद्वारे त्यांच्याबाबत असत्य, अप्रामाणिक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याचा गंभीर प्रयत्न होत आहे, असा आरोप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कर्जत तालुयाच्यावतीने करण्यात आला असून हा चित्रपट कर्जत तालुयात प्रकाशित केला जाऊ नये यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
चित्रपट रंगतदार तयार करण्यासाठी लेखक दिग्दर्शक आपले हिताचे धोरण आणत चुकीचा इतिहास जगासमोर मांडत आहेत. परंतु इतिहास पुसला जाऊ नये यासाठी अनेक संस्था, संघटना काम करीत असून याला विरोध दर्शवताना पाहतो. नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘खलिद का शिवाजी’ या चित्रपटातही असेच चुकीचे आणि आक्षेपार्ह काही मजकूर दिग्दर्शकाने चित्रीकरणातून समोर आणल्याने याला जगभरातून कडाडून विरोध होत आहे.
कर्जत तालुयात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान-धारकरी यांनी या चित्रपटाला थिएटरमध्ये चालवण्यासाठी विरोध केला आहे. कर्जत येथील सिनेफ्लेस (राजनव्हा) आणि नेरळ येथील युक्ती फनस्कोर या चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करू नये म्हणून संघटनेकडून थिएटर मालकास तसेच पोलीस विभागाला यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की सदर चित्रपटात असा खोटा दावा केला जात आहे की, छत्रपतींच्या सैन्यात ३० टक्के मुस्लिम मावळे होते, त्यांनी श्री रायगडावर मशीद बांधली.
ही दोन्ही विधाने पूर्णपणे तथ्यहीन, ऐतिहासिक पुराव्याविरुद्ध आणि जनतेची दिशाभूल करणारी आहेत. श्री रायगडावर कोणतीही मशीद असल्याचे दस्तऐवज नाहीत. छत्रपती शिवरायांनी धर्मस्थळांचे पुनरुज्जीवन केले, हे मात्र पुराव्यांनिशी सिद्ध आहे. शिवरायांचा उल्लेख अनेकदा अपमानास्पद स्वरूपात चित्रपटात करण्यात आला आहे. ही बाब मुल्यसंस्कार व राष्ट्रीयतेची जाणीव असलेल्या सर्व नागरिकांसाठी अपमानास्पद आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानक र्जत तालुयाच्यावतीने खलिद का शिवाजी चित्रपट कर्जत व नेरळ येथील कोणत्याही थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असे ठाम निवेदन देण्यात आले आहे. धारकरींनी ठामपणे असा इशारा दिला आहे की छत्रपतींच्या अपमानास वाट मोकळी करून देणार्या कोणत्याही माध्यमाला कर्जत तालुयात जागा नाही.