कर्जत | कर्जत येथील थमेश कुडेकर यांना रात्रीच्या अंधारात पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली आहे. त्या अज्ञात लोकांचा शोध घ्यावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना कर्जत शहर यांच्यावतीने कर्जत पोलीस यांना निवेदन देऊन करण्यात आली.
कर्जत येथील चार फाटा कर्जत चौक राज्यमार्ग रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्राचे समोर अंधार पडलेला असताना कर्जत शहरातील प्रथमेश कुडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा निषेध करीत कर्जत शहर शिवसेनेच्यावतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
निवेदनात या गंभीर घटनेतील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळावे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.