अलिबाग | वैध मापन शास्त्र, यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहकांच्या तक्रारीचे वेळेवर निराकरण करणे या उद्देशाने उपनियंत्रक वैध मापन शास्त्र, रायगड जिल्हा क्रमांक १ यांच्यावतीने कार्यालय, निरीक्षक वैध मापन शास्त्र, पनवेल नर्मदा कॉम्फ्लेस गाळा क्रमांक ३४, ३५, व ३६ स्टेशन रोड पनवेल येथे आज, ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपनियंत्रक वैध मापन शास्त्र रायगड जि.क्र.१ संजीव कवरे यांनी दिली आहे.
जनता दरबारामध्ये ग्राहक संघटना, व्यापारी उपयोगकर्ते संघटना, उत्पादक, पॅकर यांना वैध मापन शास्त्र, अधिनियम २००९ व त्या अंतर्गत नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यांच्या कांही अडचणी असल्यास त्यांचे निराकरणही करण्यात येईल. जनता दरबारामध्ये प्राप्त होणार्या तक्रारी, सुचनाचे निराकरण करण्यासाठी व तात्काळ कार्यवाही करण्यासाठी विभागामधील अधिकारी प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.
ग्राहक, वजने मापे उपयोगकर्ते, उत्पादक, आयतदार, औद्योगिक आस्थापना पॅकर तसेच परवानाधारक यांच्या कांही तक्रारी असल्यास कार्यालयाच्या Email ID - aclmrigad@yahoo., या ई-मेलवर किंवा प्रत्यक्ष कार्यालयमध्ये पाठवण्यात यावे.