कर्जत | सर्वांसाठी घरे - २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात व ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी शनिवारी, २ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक पार पडली.
या बैठकीला कर्जत, खालापूर, खोपोली आणि माथेरान विभागाचे तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते. शासकीय जागेवरील घरे अधिकृत करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्जत नगरपरिषद येथील भिसेगाव आदिवासी वाडीत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली. आणि लवकरच घरे नावावर होणार असल्याचा शब्द दिला आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी, पार्वती वामन वाघ - ग्राम महसूल अधिकारी शीतल मोरे - मंडळ अधिकारी, संतोष जांभळे - मंडळ अधिकारीकडाव तर नगरपरिषदेचे कार्यालीन अधिक्षक रविंद्र लाड, बापू बहीराम उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी शासकीय जागेवरील घरे नियमकुलीत करण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार केले होते. निवडणुकीदरम्यान तत्कालीन मुख्याधिकारी वैभव गारवे, त्यानंतर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी वाडीमध्ये येऊन पाहणी केली.
ती वेळेवर बैठकीत विषय घेण्यात येत होता. त्याची अंमलबजावणी झाली असून लवकरच सर्वांना हक्काचे घरे मिळणार आहे. शासकीय जागेवरील असलेली घरे नियमित करण्यासाठी शुक्रवारी महसूल सप्ताहाचे आयोजन केले होते. शासन निर्णयान्वये महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिनानिमित्त सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात व ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत महसुल व वन विभाग यांच्याकडील २९ जुलै रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कार्यक्रम आयोजित केले होते. भिसेगावात पाच आरक्षण पडल्याने विशेष दखल उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी घेतली आहे.