रोहा | टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून रोहा येथे टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्र एका वर्षात सुरु होणार असून दरवर्षी तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. कोकणात एआय दालन आणण्यासाठी खा. सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांनी प्रयत्न केले.
कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्यवर्धन कोर्सची उपलब्धता होणार असून, रोहा नदीसंवर्धन प्रकल्प येथे शनिवारी, २ ऑगस्ट रोजी टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खा. सुनील तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, डॉ.पी.अन बलगन, शासकीय प्रकल्प आणि कौशल्य विकास टाटा टेक्नॉलोजीज लि. पुणे, प्रितम गंजेवार, प्रकल्प समन्वय, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, संतोष पोटफोडे, आप्पा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
टाटा टेक्रॉलॉजी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी व औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प एमआयडीसीसोबत करण्याचा मानस व्यक्त केला होता. या प्रकल्पामध्ये दरवर्षी अंदाजे ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये ११५.०० कोटी इतकी आहे. एकूण अंदाजे ९८.०० कोटी रक्कम टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उर्वरित खर्च रुपये १७. कोटी (वस्तु व सेवाकर वगळून) महामंडळाकडून संचालक मंडळाच्या मान्यतेने उपलब्ध करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा रोहा नगरपालिकेमार्फत १८ हजार ५०० फूट (१७०० चौ.मी.) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कौशल्यवर्धन केंद्र १२५००.०० चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत टाटा मार्फत उभारणी करण्या येणार आहे. प्रस्तावित कौशल्यवर्धन केंद्र इमारतीचे इमारत नकाशे मंजुरी रोहा महानगरपालिकेमार्फत अंतिम टप्यात असून त्यानुसार लवकरच इमारत बांधकामास सुरुवात होणार आहे.
या प्रकल्पाची इमारत माहे मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी करण्यात येणाः या बांधकामासह तेथे उपलब्ध होणार्या सर्व मशीनरी, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधने आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर व इतर सर्व वस्तूंचे हस्तांतरण महामंडळास होणार आहे व सदरचे प्रशिक्षण केंद्र टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचे मार्फत संचालित करण्यात येणार आहे. केंद्रमार्फत ९ अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत.
जगातील उत्तमप्रकारे टेक्नॉलॉजी असलेले ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे कौशल्य विकास टेक्नॉलॉजीचा फायदा रोह्यासह रायगड जिल्ह्यातील युवकांनी याचा फायदा होणार आहे. - सुनील तटकरे, खासदार रायगड
तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दरवर्षी दिली जाणार आहे. राज्यात ९ सेंटर उभे राहणार आहेत, त्यात रोह्यातील हे पहिले सेंटर असणार आहे. त्यामुळे युवकांना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. -अदिती तटकरे, मंत्री, महिला व बालविकास